जॉब वार्ता : 'पीएम इंटर्नशिप' पोर्टलवर येत्या ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू, त्वरा करा

पहिल्या बॅचमध्ये १.२५ लाख बेरोजगार लोक इंटर्नशिप करतील, कार्यक्रमाची सुरुवात ४ राज्यांमधून सुरू होईल.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
9 hours ago
जॉब वार्ता : 'पीएम इंटर्नशिप' पोर्टलवर येत्या ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू, त्वरा करा

नवी दिल्ली : अर्थसंकल्पात जाहीर केलेला पीएम इंटर्नशिपचा पायलट प्रोजेक्ट ३ ऑक्टोबर रोजी सुरू करण्यात आला. पहिल्या तुकडीत महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड आणि तेलंगणातील १.२५ लाख उमेदवारांना संधी मिळणार आहे. खाजगी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या ३ ते १० ऑक्टोबर दरम्यान पोर्टलवर नोंदणी करू शकतील, तर उमेदवारांना १२ ते २५ ऑक्टोबर दरम्यान नोंदणी करू शकतील.


२६ ऑक्टोबर रोजी, शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी कंपन्यांना दिली जाईल.  २७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान याच यादीतून पात्र उमेदवारांची निवड करतील. एकंदरीत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष इंटर्नशिप २ डिसेंबरपासून सुरू होईल व वर्षभर सुरु राहील.

कोण अर्ज करू शकतो

* पात्र व इच्छुक उमेदवारांनी pminternship.mca.gov.in वर अर्ज करावा.  २१ ते २४ वयोगटातील युवक या योजनेंतर्गत पात्र आहेत. जे उमेदवार ऑनलाइन किंवा लॉन्ग डिस्टन्सद्वारे शिक्षण घेत आहेत ते देखील अर्ज करू शकतील.

2025 Summer Internship - Mechanical Engineering - Freeport, TX Job Details  | BASF SE

* १०वी, १२वी उत्तीर्ण झालेले उमेदवारही पात्र या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र प्राधान्य आयटीआय किंवा पॉलिटेक्निकचे प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा किंवा BA, B.Sc., B.Com, BCA, BBA, B.फार्मा यासारख्या पदव्या असणाऱ्यांना  आहे.

कोण अर्ज करू शकत नाही

*IIT, IIM, राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, NID, TripleIT, IISER मधून पदवीधर. ज्यांच्याकडे CA, CS, CMA, MBBS, BDS, MBA सारख्या पदव्या आहेत. ज्या उमेदवारांनी केंद्र किंवा राज्य सरकार प्रमाणित कौशल्य प्रशिक्षण, इंटर्नशिप घेतली आहे.


Mechanical Engineering Internship Abroad | StudentsGoAbroad

*ज्यांच्या पालकांचे किंवा जोडीदाराचे २०२३-२४ मध्ये उत्पन्न ८ लाख रुपये आहे. किंवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत आहेत.

 पहिल्या दिवशी, कृषी, ऑटोमोबाईल आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्यांनी उत्पादन आणि देखभाल संबंधित कामासाठी १,०७७ इंटर्नशिप्स ऑफर केल्या आहेत. यापैकी ९० टक्के आयटीआय डिप्लोमा धारकांसाठी आहेत. उमेदवारांना दरमहा ५ हजार रुपये मिळणार आहेत. त्यापैकी ४५०० रुपये केंद्र सरकार डीबीटीद्वारे देईल तर कंपन्या CSR फंडातून ५०० रुपये देतील. याशिवाय ६ हजार रुपयांची  एकरकमी रक्कमही दिली जाईल. काही कंपन्यांनी दुपारचे जेवण आणि ट्रान्सपोर्ट सेवा देण्याचेही आश्वासन दिले आहे. अर्थसंकल्पात ५ वर्षांत १ कोटी लोकांना इंटर्नशिप देण्याची घोषणा करण्यात होती. 


Mechanical Engineering | Mechanical Engineering in India

पायलट प्रोजेक्टच्या पहिल्या दिवशी १११  कंपन्या दाखल झाल्या . त्यांना इंटर्नशिपसाठी व्हर्च्युअल प्रशिक्षण दिले जात आहे. एक कॉल सेंटर देखील उघडण्यात आले आहे.  हिंदी, इंग्रजीसह १० भारतीय भाषांमध्ये सर्वांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. पहिल्या दिवशी आलेल्या कॉल्समध्ये ४४ टक्के पदवीधर, १३ टक्के पदव्युत्तर, १४ टक्के १२वी पास, ३ टक्के १०वी पास आणि एक टक्का ८वी पास उमेदवारांनी फोन करून चौकशी केली. २० टक्के कॉल इतर उमेदवारांचे होते.


Mechanical Engineer Intern - ECA Internships

इंटर्नशिप निवड प्रक्रियेत SC, ST, OBC आणि दिव्यांग श्रेणीचा कोटा देखील लागू होईल, उमेदवारांची निवड करताना, त्यांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात किंवा जवळपासच्या परिसरात इंटर्नशिपची संधी मिळावी याची विशेष काळजी घेतली जाईल.


हेही वाचा