वर्ल्ड चॅम्पियनशीप लिजेंड्स स्पर्धेला सुरुवात

इंग्लंडविरुद्धच्या शुभारंभी सामन्यात भारत ‘चॅम्पियन’

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
03rd July, 11:39 pm
वर्ल्ड चॅम्पियनशीप लिजेंड्स स्पर्धेला सुरुवात

बर्मिंगहॅम : वर्ल्ड चॅम्पियनशीप लिजेंड्स स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात झाली. दरम्यान, बुधवारी झालेल्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळविला. या स्पर्धेचे यंदाचे हे पहिलेच पर्व आहे. या स्पर्धेत एकूण ६ संघ आमनेसामने भिडणार आहेत. एकूण १८ सामने या स्पर्धेत होणार आहेत. या स्पर्धेसाठी त्या त्या संघातील माजी खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने हे नॉर्थम्पटन आणि बर्मिंगहॅम येथे खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी आगामी ११ दिवस दिग्गज आणि आवडत्या खेळाडूंना पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळणार आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स स्पर्धेच्या पहिला हंगाम ३ ते १३ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेत इंडिया, पाकिस्तान, विंडिज, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे ६ संघ आहेत. प्रत्येक संघ उर्वरित ५ संघ १-१ सामना खेळणार आहे. त्यानंतर ४ अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर १३ जुलै रोजी महाअंतिम सामना होईल.
सहा संघ सहा कर्णधार
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृ्त्त झालेले खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. युवराज सिंह, युनूस खान, जॅक कॅलिस, केविन पीटरसन, ख्रिस गेल आणि ब्रेट ली या ६ जणांकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सामन्यांचे वेळापत्रक
४ जुलै : इंग्लंड वि. द. आफ्रिका
४ जुलै : वेस्ट इंडिज वि. पाकिस्तान
५ जुलै : ऑस्ट्रेलिया वि. द. आफ्रिका
५ जुलै : भारत वि. वेस्ट इंडिज
६ जुलै : इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया
६ जुलै : भारत वि. पाकिस्तान
७ जुलै : वेस्ट इंडिज वि. द. आफ्रिका
७ जुलै : इंग्लंड वि. पाकिस्तान
८ जुलै : भारत वि. ऑस्ट्रेलिया
९ जुलै : वेस्ट इंडिज वि. इंग्लंड
९ जुलै : द. आफ्रिका वि. पाकिस्तान
१० जुलै : वेस्ट इंडिज ‌वि. ऑस्ट्रेलिया
१० जुलै : भारत वि. द. आफ्रिका
१२ जुलै : पहिली सेमी फायनल
१२ जुलै : दुसरी सेमी फायनल
१३ जुलै : अंतिम सामना

भज्जीचा षटकार; टीम इंडिया विजयी
बर्मिंगहॅमच्या मैदानावर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स २०२४च्या पहिल्याच सामन्यात बर्थडे बॉय हरभजन सिंगने मैदानावर येताच पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. इंग्लंड चॅम्पियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात भारत चॅम्पियन्ससमोर विजयासाठी १६६ धावांचे लक्ष्य होते. तत्पूर्वी, इयान बेलच्या नाबाद ५९, स्मित पटेलच्या २५ चेंडूत ५१ आणि ओवेस शाहच्या ९ चेंडूत २३ धावांच्या जोरावर इंग्लंड लायन्सने १६५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात रॉबिन उथप्पाच्या ५० आणि गुरकीरत मानच्या ३३ धावांच्या जोरावर भारतीय चॅम्पियन्सने सहज विजय मिळवला.