राष्ट्रीय स्तरावरील लगोरी स्पर्धेत गोव्याच्या संघाला विजेतेपद

उज्जेत उदय गावडे यांना सुवर्ण पदक : मुलींच्या संघाला उपविजेतेपद

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
02nd July, 12:35 pm
राष्ट्रीय स्तरावरील लगोरी स्पर्धेत गोव्याच्या संघाला विजेतेपद

वाळपई: चिपळूण रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्युनियर लगोरी राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याच्या मुलांच्या संघाने अजिंक्यपद पटकाविले आहे. तर मुलींच्या गटात गोव्याच्या संघाला उपविजेतेपद प्राप्त झालेले आहे.मुलांच्या संघातील खेळाडू उज्जेत उदय गावडे यांना उत्कृष्ट खेळाबद्दल सुवर्णपदक प्राप्त असून दोन्ही संघांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 

देशी खेळांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय स्तरावरील लगोरी स्पर्धा चिपळूण रत्नागिरी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती .यामध्ये गोव्याच्या संघाने लक्षणीय कामगिरी केली आहे .या स्पर्धेमध्ये देशाच्या वेगवेगळ्या राज्यातील अनेक संघाने भाग घेतला होता. सुरुवातीपासूनच मुलांच्या संघाने सातत्याने विजय प्रस्थापित केला. या स्पर्धेमध्ये या संघाला विजेतेपद प्राप्त झाले. या संघातील खेळाडू उज्जेत उदय गावडे यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केल्याबद्दल त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. यामुळे संघाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आलेली आहे .त्याचप्रमाणे सत्तरी तालुक्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. उज्जेत उदय गावडे हा पिसुर्ले धोनकलवाडा  या ठिकाणी राहणार आहे .सुरुवातीपासून त्याला लगोरी  खेळाची अत्यंत आवड होती. त्यांनी सातत्याने या खेळामध्ये सराव करून चांगल्या प्रकारचे प्रदर्शन घडविले. त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाल्याबद्दल सत्तरी तालुक्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात आलेले आहे सत्तरी पत्रकार संघाने देखील उज्जेत उदय गावडे याचे अभिनंदन केले आहे. 

पिसुर्ले पंचायतीचे सरपंच देवानंद परब यांनी उज्जेत उदय गावडे यांचे अभिनंदन केले आहे . त्याच्या यशामुळे पिसुर्ले पंचायत क्षेत्रात त्याचप्रमाणे सत्तरी तालुका व गोव्याचा नावलौकिक वाढलेला आहे. येणाऱ्या काळात लघोरी स्पर्धेच्या माध्यमातून संघाकडून अनेक अपेक्षा आहेत. पंचायतीकडून आवश्यक स्वरूपाचे सहकार्य त्यांना निश्चितच करण्यात येईल असे आश्वासन देवानंद परब  यांनी दिलेले आहे.