फोंडा येथील हेडगेवार विद्यालयाला बुद्धिबळमध्ये अजिंक्यपद

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
03rd July, 12:01 am
फोंडा येथील हेडगेवार विद्यालयाला बुद्धिबळमध्ये अजिंक्यपद

फोंडा हेडगेवार विद्यालयाच्या बुद्धिबळ विजेत्यांसह शारीरिक शिक्षक तन्वेश वेंगुर्लेकर व इतर. 

फोंडा : गोवा क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याने आयोजित केलेल्या फोंडा तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत फोंड्याच्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार विद्यालयाला १४ वर्षाखालील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळाले. या अजिंक्यपदासोबतच हेडगेवार विद्यालयाचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
दरम्यान, तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालयाच्या अवनीश बोरकर, स्वयम नाईक, आरुष नाईक, विवान वेरेकर, मयुरेश नाईक यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. या संघाला शारीरिक शिक्षक तन्वेश वेंगुर्लेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष उदय तिळवे, व्यवस्थापक सुदेश कवळेकर अन्य पदाधिकारी व मुख्याध्यापक सर्वेश्वर भैरेली तसेच शिक्षक वर्गाने विजयी स्पर्धकांचे व शारीरिक शिक्षक तन्वेश वेंगुर्लेकर यांनी अभिनंदन केले.