आयसीसी टी२० रँकिंग: अष्टपैलूंच्या यादीत हार्दिक पांड्या ठरला नंबर वन, टॉप १०मध्ये जबरदस्त बदल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd July, 02:30 pm
आयसीसी टी२० रँकिंग: अष्टपैलूंच्या यादीत हार्दिक पांड्या ठरला नंबर वन, टॉप १०मध्ये जबरदस्त बदल

नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकानंतर आयसीसीच्या टी-२०रॅंकिंगमध्ये जबरदस्त बदल घडून आला आहे. भारतीय संघातील खेळाडूंसाठी तर जणू आकाशच ठेगणे झाले आहे. भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्याने अष्टपैलूंच्या यादीत तब्बल २ स्थानांची झेप घेत अव्वल स्थान पटकावले आहे. हार्दिक पंड्या आणि श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा यांचे रेटिंग समान असले तरी, हार्दिकला आयसीसीने पहिल्या क्रमांकावर ठेवले आहे. जर आपण उर्वरित खेळाडूंच्या रॅंकिंगमध्ये देखील जबरदस्त बदलत पहायला मिळत आहेत. हार्दिक पंड्या को वर्ल्ड चैंपियन बनते ही मिली एक और बड़ी खुशखबरी, ये तो  कमाल ही हो गया | Hardik Pandya is the new Number one all-rounder in the  latest ICC T20I

आयसीसीने जाहीर केलेल्या टी२० मधील अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत हार्दिक पांड्या २२२ च्या रेटिंगसह अव्वल स्थानी आहे. त्याने दोन स्थानांनी झेप घेतली आहे. हार्दिक पांड्याने टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि त्यानंतरच्या अंतिम फेरीत अप्रतिम कामगिरी केली होती. सामन्याचे शेवटचे षटक टाकत असताना भारतीय संघाला चॅम्पियन बनवण्यातही त्याचे मोठे आणि महत्त्वाचे योगदान होते. यासोबतच वानिंदू हसरंगा देखील २२२ रेटिंगसह हार्दिकसह पहिल्या स्थानावर आहे.   Ind vs SA T20 World Cup Final: हार्दिक पंड्या भावुक होत म्हणाला, 'गेल्या  सहा महिन्यात माझ्या आयुष्यात बरंच काही घडलं.....पण माझा दिवस येईलच याची  खात्री ...

 ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनिसने  एका स्थानाची झेप घेतली आहे. तो आता या यादीत २११ रेटिंगसह तिसऱ्या स्थानी आहे. झिम्बाब्वेच्या सिकंदर रझालाही एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो २१० रेटिंगसह चौथ्या क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू बनला आहे. तर बांगलादेशचा शाकिब अल हसन २०६ रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. 

दरम्यान, अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीचे नुकसान झाले आहे. त्याचे रेटिंग २०५ असून  तो ४ स्थानांनी घसरून सहाव्या स्थानावर आला आहे. नेपाळचा दीपेंद्र सिंग १९९ रेटिंगसह सातव्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टनने एका स्थानाची प्रगती केली आहे. तो आता १८७ रेटिंगसह आठव्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम १८६ रेटिंगसह ९व्या क्रमांकावर आहे. त्यालाही एका जागेचे नुकसान झाले आहे. इंग्लंडचा मोईन अली आता नवव्या स्थानावरून घसरत दहाव्या स्थानावर आला आहे. त्याचे रेटिंग १७४ आहे. T20 World Cup : Indian All Rounder Hardik Pandya Responded To Critics After  The Title Win - Amar Ujala Hindi News Live - T20 World Cup :खिताबी जीत के  बाद हार्दिक पांड्या