विश्वनाथन आनंदने विक्रमी १०व्यांदा पटकावले लियॉन मास्टर्सचे जेतेपद

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
03rd July, 11:48 pm
विश्वनाथन आनंदने विक्रमी १०व्यांदा पटकावले लियॉन मास्टर्सचे जेतेपद

स्पेन : भारताचा पाच वेळा विश्वविजेता मद्रास टायगर विश्वनाथन आनंदने विक्रमी दहाव्यांदा, सिंहांचे शहर अशी ओळख असलेल्या स्पेनमधील लिओन येथे होणाऱ्या लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
५५ वर्षीय आनंदने त्याची पत्नी अरुणा आनंदच्या वाढदिवसानिमित्त आनंदने सोशल मीडिया एक्सवर एक हृदयस्पर्शी किस्सा शेअर केला. आपल्या पत्नीच्या ५० व्या वाढदिवशी सामना खेळण्याबाबत अनिर्णित असलेल्या आनंदला त्याच्या पत्नीने प्रोत्साहन दिले आणि म्हणाले, ‘कोणास ठाऊक, तू जिंकू शकतोस.’ दरम्यान, या जलद स्वरूपाच्या स्पर्धेत आनंदने अंतिम फेरीत स्पेनच्या सँटोस जैमेचा ३-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले, याआधी आनंदने उपांत्य फेरीत बल्गेरियाच्या माजी विश्वविजेत्या वेसेलिन टोपालोव्हचा २.५-१.५ असा पराभव केला होता. सँटोसने भारताच्या अर्जुन इरिगासीचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

ल्योन मास्टर्सची सुरुवात १९८८ मध्ये झाली होती आणि आत्तापर्यंत आनंदने यात एकूण १६ वेळा भाग घेतला आहे. याआधी हे प्रतिष्ठित विजेतेपद व्लादिमीर क्रॅमनिकने जिंकले आहे. वेसेलिन टोपालोव्ह आणि मॅग्नस कार्लसन सारख्या जगज्जेतेही ही स्पर्धा जिंकले आहेत.