वेळापत्रक बदलले; 'प्रवाह'ने गोव्यातून सुरू केली म्हादईची पाहणी!

काय म्हणाले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत? इथे सविस्तर वाचा...

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
04th July, 04:42 pm
वेळापत्रक बदलले; 'प्रवाह'ने गोव्यातून सुरू केली म्हादईची पाहणी!

पणजी : म्हादईप्रश्नी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या  'प्रवाह'ने आपल्या नियोजित वेळापत्रकात बदल केला आहे. या आधी हे पथक आजपासून (४ जुलै) महाराष्ट्रातून नदीच्या पात्राची पाहणी करणार होते. पण काही तांत्रिक अडचणींचा हवाला देत पथकाने आजपासून गोव्यातून पाहणी सुरू केली आहे. गोव्यातील पाहणीनंतर 'प्रवाह'चे पथक महाराष्ट्र आणि त्यानंतर कर्नाटकच्या भागांत पाहणी करेल. त्यानंतर ८ जुलै रोजी समितीची दुसरी बैठक बंगळुरू येथे होणार आहे. 

'प्रवाह'चे पथक ७ जुलै रोजी कर्नाटकातील कळसा-भांडुरा  प्रकल्पासाठी केलेल्या बांधकामाची पाहणी करणार आहे. त्यावेळीच कर्नाटकचे पितळ उघडे पडेल. गोव्यासाठी ही पाहणी अत्यंत महत्त्वाची ठरेल. सर्व नियम धाब्यावर बसवून कर्नाटकने केलेल्या बांधकामासंबंधीचे सत्य प्रवाह प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमोर उघड होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत य‍ांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.  flow authority team will inspect the construction work done by Karnataka for the Kalsa, Bhandura project on Sunday | प्रवाह प्राधिकरणाचे पथक येत्या रविवारी कळसा, भंडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकने केलेल्या बांधकामाची पाहणी करणार

दरम्यान, ७ रोजी सकाळी ९.३० वाजता 'प्रवाह'चे अधिकारी कर्नाटकातील हलतरा नाल्यास भेट देतील. त्यानंतर सकाळी ११ वाजता कळसा नाल्याची पाहणी करतील. कोटनी धरण स्थळ व नेर्से येथील भ‍ांडुरा नाल्याचीही हे पथक पाहणी करणार आहे. तत्पूर्वी ५ व ६ जुलै रोजी पथक गोव्यात असेल. ८ जुलै रोजी बंगळुरू येथे 'प्रवाह'ची दुसरी बैठक होणार आहे.