दिगंबर कामत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd July, 04:51 pm
दिगंबर कामत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट

पणजी : पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांची बदली, मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत दिल्लीत असतांनाच आमदार दिगंबर कामत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. मडगावातील रिंग रोड आणि कोंब सर्कल येथील उड्डाणपूलासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आमदार कामत यांनी ट्विट करून दिली.    

मुख्यमंत्री दिल्लीत असतांना कामत यांनी गडकरी यांची भेट घेतल्याने राजकीय पटलावर चर्चेस उत आला आहे. रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले आहे आणि कोंबा-मडगाव येथील प्रस्तावित उड्डाणपुलाला लवकर मंजुरी देण्याची मागणी केली आहे. ही सदिच्छा भेट असल्याचे ट्विट आमदार दिगंबर कामत यांनी केले. 

 गोव्याचे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी मंगळवारी दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेतली. तत्पूर्वी ऊर्जामंत्री सुदिन ढवळीकर यांनी केंद्रीय अक्षय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. आमदार दिगंबर कामत हेही बुधवारी दिल्लीत दाखल झाल्याने आता गोव्याच्या मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा