सिंधुदुर्ग : मच्छीमारी करून परत येत असताना एक बोट निवती समुद्रात उलटली. या घटनेत दोन खलाशी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटना पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान घडल्याचा अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीत १४ खलाशी होते. त्यातील २ खलाशी बेपत्ता आहेत. इतरांनी दुर्घटनेनंतर किनाऱ्यावर येत आपले जीव वाचवले. घटनेची माहिती मिळताच बोटीचे मालक आनंद धुरी व स्थानिक सरपंच अवधूत रेगे यांनी पहाटेच्या सुमारास धाव घेतली. दरम्यान घटनास्थळी स्थानिक पोलीस तसेच अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले असून, तपासकार्य सुरू आहे.