याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन विनापरवाना बंदुका आणि काही काडतुसे देखील जप्त केली आहेत.
सावंतवाडी : जंगलात शिकारीसाठी गेले असता बंदुकीचा बार उडाल्याने छर्रे लागून पारपोली गुरववाडी येथील कृष्णा अर्जुन गुरव (वय ३५) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. हा प्रकार २५ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास लिंगाचे वांयगण येथील जंगलात घडला. जखमीवर सध्या गोव्यातील गोमॅकॉत उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील वेदांत लक्ष्मण गुरव (२२) रविकांत वसंत गुरव (४०) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान विनापरवाना बंदूक वापरत एकाच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरलेल्या वेदांत लक्ष्मण गुरव (२२) आणि रवींद्र वसंत गुरव (वय ४०) याला काल २९ डिसेंबर रोजी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. दरम्यान या गुन्ह्यात वापरलेल्या दोन ठासणीच्या बंदुका पारपोली-गुरववाडी येथील जंगलातून जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली
या प्रकरणी जखमी झालेला कृष्णा गुरव याच्यावर गोमॅकॉ येथे उपचार सुरू असून सध्या त्याची तब्येत सुधारत आहे. त्याची प्रकृती ठिक झाल्यानंतर त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणात मुख्य संशयित वेदांत गुरव याच्या हातात असलेल्या बंदुकीच्या गोळी लागून कृष्णा हा जखमी झाला होता. हा प्रकार घडल्यानंतर त्याला रुग्णालय दाखल करण्यात आले होते. परंतु या प्रकाराची वाच्यता न करता प्रकरण दडपण्याचा प्रकार सुरु होता. मात्र याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी त्या तिघांवर गुन्हा दाखल करत दोघांवर गुन्हा दाखल केला.
पाटवळ येथे मंगळवारी २४ डिसेंबरच्या मध्यरात्री रानटी जनावरांच्या शिकारीसाठी समद खान व इतर दोघे गेले होते सदर ठिकाणी शिकार करीत असतानाच समद खान याच्या छातीवर गोळी लागल्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. झालेल्या समद खान याच्यावर गुरुवारी संध्याकाळी शोकाकुल अवस्थेत नाणूस या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात आले.
माहितीनुसार, शिकार करण्यात येणार होती त्या ठिकाणी एक नदी आहे. नदीच्या पलीकडे समद खान हा शिकारीसाठी लपून बसला होता. तर इतर दोघे नदीच्या अलीकडे बसले होते. , पोलिसांनी गोळी झाडण्यासाठी वापरण्यात आलेली बंदूक व काडतूस जप्त केली. अचानक बंदुकीतून सुटलेली गोळी समदच्या छातीत घुसल्याने त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात काहींना समन्स बजावण्यात आले होते. दरम्यान संशयितांच्या चिंचमळ येथील घराची व सभोवतालची झाडाझडती सुरू केली. गेल्या तीन दिवसांमध्ये शंभरपेक्षा जास्त घरांची झाडाझडती घेण्यात आली. त्याचप्रमाणे अनेकांचे जबाब नोंद करून घेण्यात आले.चार दिवसांपासून सदर प्रकरणाच्या तपासाला गती देताना पोलिसांनी अनेकांच्या जबाब नोंदविले आहेत. यातून अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची अपेक्षा आहे.
पोलिसांनी संशयितांकडून आतापर्यंत मिळवलेल्या माहितीनुसार, या भागामध्ये अनेक जण बेकायदेशीरपणे बंदूक वापरत आहेत. या भागात गव्यांची शिकार यापूर्वी करण्यात आली आहे. हे मांस अनेक हॉटेल्स व आस्थापनांमध्ये पोहोचलेले आहे. याची पोलीस चौकशी करीत आहेत. तसेच या भागांमध्ये आक्षेपार्ह वस्तू असल्याचा पोलिसांना सुगावा लागला आहे. यामुळेच सदर प्रकारचे ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी पाच तुकड्या तयार केल्या आहेत.