उसगाव येथे कोसळले झाड; केवळ दैव बलवत्तर म्हणून टळली दुर्घटना

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
01st July, 04:10 pm
उसगाव येथे कोसळले झाड; केवळ दैव बलवत्तर म्हणून टळली दुर्घटना

फोंडा : पालवाडा -उसगाव येथील सरकारी विद्यालय समोरील मुख्य रस्त्यावर सोमवारी सकाळी झाड कोसळले. त्यावेळी रस्त्यावरून जाणारी कार झाडाखाली येण्यापासून बचावाल्याने दुर्घटना टळली. फोंडा अग्निशमन दलाचे कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर कोसळलेले झाड बाजूला केले.

पालवाडा येथील एकेरी मार्गावर रस्त्याच्या बाजूला असलेले झाड कोसळले. रस्त्यावर झाड कोसळत असल्याचे दिसताच त्या  रस्त्यावरून जाणाऱ्या कार चालकाने ब्रेक लावून वेळीच कार थांबवल्याने दुर्घटना टळली. एकेरी मार्ग असल्याने वाहतुकीवर परिणाम दिसून आला नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर कोसळेलेले झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा