बाणावलीत विजेचा धक्का लागून १८ महिन्याच्या मूलीचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th July, 03:42 pm
बाणावलीत विजेचा धक्का लागून १८ महिन्याच्या मूलीचा मृत्यू

मडगाव : बाणावली येथील भाड्याच्या घरात राहणार्‍या मूळ झारखंड येथील एका कुटुंबातील १८ महिन्यांच्या मुलीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. याप्रकरणी कोलवा पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बाणावली परिसरात झारखंड येथील कुटूंब भाड्याने राहत होते. बुधवारी कुटुंबातील १८ महिन्यांच्या मुलीचा खेळता खेळता वीजवाहिनीशी संपर्क आला. घटनेवेळी मुलीचे वडील मजुरीला गेलेले होते. विजेचा धक्का बसल्यानंतर मुलगी बेशुद्ध पडली. 

तिला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. तिच्यावर उपचार करण्यात आले पण तिने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला मृत घोषित केले. कोलवा पोलिसांना याची माहिती देण्यात आलेली असून पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यू म्हणून प्रकरण नोंद करण्यात आले आहे.