कुठ्ठाळीत कॉंग्रेसच्या बैठकीत हमरीतुमरी : वेर्णा पोलीस स्थानकात मारहाणीची तक्रार

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
46 mins ago
कुठ्ठाळीत कॉंग्रेसच्या बैठकीत हमरीतुमरी : वेर्णा पोलीस स्थानकात मारहाणीची तक्रार

वास्को : गोव्यातील (Goa) कुठ्ठाळीत (Cortalim) कॉंग्रेस गटाच्या (Congress block) बैठकीत हमरीतुमरी झाली. वादाचे पर्यावसन भांडणात झाले व नंतर मारहाणीपर्यंत पोचले. त्यामुळे पोलिसांना (Goa Police) ही बोलवावे लागले. यासंदर्भात वेर्णा पोलीस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली आहे. पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने; सध्या त्याची चर्चा सुरू आहे. 

यासंदर्भात कॉंग्रेसचे कुठ्ठाळी गटाध्यक्ष पीटर डिसोझा यांनी वेर्णा पोलीस स्थानकता नोंदवलेल्या तक्रारीत ऑलान्सियो सिमॉईश यांनी आपल्याला मारहाण केल्याचे म्हटले आहे. शिष्टाचार न पाळता कॉंग्रेसच्या कुठ्ठाळी गटाची बैठक बोलावण्यात आली होती. यासंदर्भात आपण विचारायला गेलो असता; प्रथम शिव्या दिल्या व नंतर मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. 






हेही वाचा