गोव्यासाठी दिल्लीत ‘डीजीपीं’चा शोध

‘हे’ अधिकारी असू शकतात नवे डीजीपी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
01st July, 04:57 pm
गोव्यासाठी दिल्लीत ‘डीजीपीं’चा शोध

पणजी : आसगाव येथे आगरवाडेकर कुटुंबियांचे घर पाडण्याच्या प्रकरणात गोव्याच्या पोलीस महासंचालकांचे नाव आल्याने सध्या पोलीस खाते टीकेचे लक्ष बनले आहे. गोव्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांनी पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांची तत्काळ बदली करावी यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. जयपास सिंग यांची मिझोरम किंवा दिल्लीत बदली होऊ शकते. 

आज पणजीत एका कार्यक्रमात मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल आणि डीजीपी जसपाल सिंग एकत्र आले होते. वादानंतर दोन्ही अधिकारी प्रथमच एका व्यासपीठावर होते.

गोव्यात पोलीस महासंचालक म्हणून दिल्लीत सेवा देत असलेले विशेष पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था ) मधुप तिवारी यांची वर्णी लागू शकते. याच दरम्यान आयपीएसच्या ॲग्मूट कॅडरमध्ये बदल होऊ शकतात. मिझोरमचे डीजीपी अनिल शुक्ला यांची दिल्लीत बदली होऊ शकते.

अंदमानचे डीजीपी देवेन शुक्ला यांचीही दिल्लीत बदली होणार आहे. मधुप तिवारी हे आयपीएसच्या ॲग्मूट कॅडरच्या १९९५ च्या बॅचचे अधिकारी आहेत. सध्या त्यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे.



हेही वाचा