वास्कोत पत्नीची हत्या; पतीला घटनास्थळावरून अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
24th May, 05:03 pm
वास्कोत पत्नीची हत्या; पतीला घटनास्थळावरून अटक

पणजी : वास्कोतील शांतीनगर येथे एका व्यक्तीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून आरोपी चलोबा केसरकर याने पत्नी चैतालीची हत्या केल्याचा संशय आहे. त्याला पोलिसांनी घटनास्थळावरूनच अटक केली.

चैतालीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ३ वर्षांपासून पती चलोबा तिचा छळ करत होता. आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्याने पत्नीचा खून केला. त्यानंतर दारात लोखंडी रॉड घेऊन लोकांना घरात जाण्यापासून रोखू लागला. याची माहिती मिळाल्यानंतर चैतालीचे वडिलांनी तिच्या सासरी धाव घेतली आणि जावयाला बळजबरी बाजूला ढकलून ते आत शिरले. तेव्हा त्यांची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी लगेच वास्को पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळावरून चालोबाला अटक केली आहे. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. दरम्यान, हा खून नेमका का केला? याचा तपास पोलीस करत आहेत.

(बातमी अपडेट होत आहे.)

हेही वाचा