घोटांचे सासांव... वडयो घालून

Story: उदरभरण |
19th May, 05:26 am
घोटांचे सासांव... वडयो घालून

टांचे सासांव हा गोमंतकीयांचा एक आवडीचा खास असा पदार्थ. एप्रिल-मे महिन्यात जेव्हा बाजारात आंबे येतात, तेव्हाच ही घोटांही बाजारात येतात. भरपूर ओल्या नारळाचा किस घालून आंबट-गोड चवीचे हे घोटांचे सासांव करताना त्यात वड्यो घातल्यास आणि एक वेगळीच चव येते. चला तर मग आज करूया, घोटांचे सासांव, वड्यो घालून...

साहित्य : ५ घोटां, ५ सुक्या मिरच्या, ५/६ कुवाळ्याच्या वड्या, अर्धा ओला नारळ किसून, कडीपत्ता, हिंग, तेल फोडणीसाठी, लिंबाएवढा गूळ.

कृती : प्रथम घोटां स्वच्छ धुवून त्यांची साले काढून घ्यावीत. ओल्या नारळाच्या किसासोबत थोडी मोहरी, सुक्या मिरच्या वाटून घ्याव्यात. एका पातेल्यात थोडे तेल घालून त्यात हिंग, मोहरी, कडीपत्त्याची फोडणी घालावी आणि त्यात वड्यो घालून तळसून घ्याव्यात. मग त्यात घोटां घालून वाटलेले मिश्रण घालावे. मिश्रण दाटसर ठेवावे. उकळी आल्यावर त्यात चवीप्रमाणे गूळ घालावा. तयार आहे गरमागरम घोटांचे सासांव, वड्यो घालून..


कविता आमोणकर