थंडगार मॅंगो मस्तानी

Story: उदरभरण |
12th May, 02:23 am
थंडगार मॅंगो मस्तानी

साहित्य 

तीन पिकलेले आंबे, चवीनुसार साखर, मॅंगो आईसक्रीम, फृटी, ड्रायफ्रूट्स बारीक करून.  

कृती

आंबे स्वच्छ धुवून त्याच्या साली काढून एका आंब्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत. उरलेल्या दोन आंब्याचा गर काढून त्यात आंब्याच्या गोडीनुसार साखर घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावा. पाहिजे असल्यास हे मिश्रण फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून थंडगार करून घ्यावे. एका ग्लासात आधी एक दोन चमचे फृटी घालावी. त्यात मिक्सरमध्ये केलेला मॅंगो शेक घालावा. वरुन एक मॅंगो आईसक्रीमचा स्कूप घालावा. त्यावर बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालावे.


कविता आमोणकर