तांदळाची खीर

Story: उदरभरण |
01st September 2024, 05:55 am
तांदळाची खीर

साहित्य 

एक वाटी बासमती तांदूळ, दोन लिटर दूध, अर्धी वाटी साखर, दोन चमचे मिल्क मसाला, थोडे काजू, थोडे बदाम, अर्धा चमचा वेलची पूड, पाव चमचा जायफळ चिमूटभर केशर, एक टेबलस्पून तूप.

कृती  

तांदूळ स्वच्छ धुऊन वाळवून घ्यावे. तूप तापवून त्यात तांदूळ थोडे कोरडे परतून घ्यावेत व दुधात शिजवत ठेवावे. तांदूळ शिजत आले की त्यात भिजवलेल्या बदामाचे पातळ काप, काजूचे तुकडे, वेलची जायफळ पूड, मिल्क मसाला, केशर व साखर घालून थोडे दाट होऊ द्यावे व खाली उतरावे. ही खीर शिजल्यावर आणखीन दाट होते म्हणून गॅसवर शिजत असताना जास्त दाट करू नये.


कविता आमोणकर