क्रिस्पी हनी बटर फ्राईड चिकन

Story: चमचमीत रविवार |
22nd September 2024, 04:22 am
क्रिस्पी हनी बटर  फ्राईड चिकन

साहित्य : 

चिकन ब्रेस्ट अर्धा किलो, कॉर्नस्टार्च १ कप, अंडे १, सफेद काळीमिरी अर्धा चमचा, सोया सॉस १ मोठा चमचा, तळण्याकरता तेल, तीळ १ मोठा चमचा, कांदा पात थोडीशी.

हनी बटर सॉस बनवण्याकरता साहित्य : 

लसूण ३ ते ४ पाकळ्या, मध ४ मोठे चमचे, बटर ४ मोठे चमचे, ब्राऊन शुगर १ मोठा चमचा, सोया सॉस मोठे चमचे, तीळ तेल १ मोठा चमचा, अर्धा चमचा कॉर्न स्टार्च दोन चमचे पाण्यात मिसळून तयार केलेली कॉर्नस्टार्चचे मिश्रण, बारीक कापलेली मिरची १ चमचा.

कृती : 

चिकन स्वच्छ धुवून त्याचे जरा मोठे तुकडे करून एका पातेल्यात घ्यावेत. त्यात एक अंडे, सोया सॉस, सफेद काळी मिरी पावडर घालून चांगले एकजीव करून घ्यावे. त्यात कॉर्न स्टार्च घालून सर्व तुकड्यांना लावून घ्यावे. एका पॅनमध्ये दोन चमचे बटर घालून वितळून त्यात लसूण बारीक करून तळसून घ्यावा. गॅसची ज्योत कमी करून त्यात सोया सॉस, मध, साखर, थोडे आणखी बटर, तिळाचे तेल, पाण्यात मिसळलेले कॉर्न स्टार्च, बारीक चिरलेली मिरची घालून मिश्रण एकसारखे दाटसार होईपर्यन्त ढवळत राहावे. मिश्रण दाटसर होत आले की, त्यात चिकनचे तळलेले तुकडे घालावेत, वरतून तीळ घालावे कांद्याची पात चिरून घालावी.


कविता आमोणकर