कुरकुरीत खमंग बटाटा कटलेट

Story: चमचमीत रविवार |
15th September 2024, 12:19 am
कुरकुरीत खमंग  बटाटा  कटलेट

साहित्य : 

चार बटाटे, अर्धा वाटी वाफवलेले मटार, पाऊण वाटी किसलेले गाजर, आले व लसूण पेस्ट दोन चमचे, कोथिंबीर, हळद, तिखट, चवीनुसार मीठ, मॅजिक मसाला, कटलेट तळण्यासाठी तेल, रवा.

कृती : 

सर्वात आधी बटाटे चांगले माऊसर उकडून घ्या. त्यांच्या साली काढून घेऊन ते कुस्करून घ्या. आता यात गाजराचा किस, वाफवलेले मटार, आले लसणाची पेस्ट, हळद, तिखट, चवीनुसार मीठ, मॅजिक मसाला हें सर्व घालून हाताने सगळे छान मिसळून घ्या. हें मिश्रण आता एका बाजूला पाच ते दहा मिनिटांसाठी ठेवा. सगळे जिन्नस छान एकजीव होऊन जातील. आता यात कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा सगळे नीट मिश्रण करून घ्या. 

आता यां मिश्रणाचे छोटे छोटे भाग घेऊन त्यांना तुम्हाला हवा तसा आकार द्या. हे कटलेट रव्यात घोळवून घ्या. गॅस पेटवून घेऊन त्यावर तवा ठेवा. तव्यावर चार पाच चमचे तेल टाकून तेल तापले की त्यावर कटलेट छान गोल्डन ब्राऊन रंग येऊन कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे झाले आतून लुसलुशीत, चवदार आणि वरून कुरकुरीत असे खमंग बटाटा कटलेट तयार! 


संचिता केळकर