चिकन पालक मेथी

Story: उदरभरण |
18th August, 06:25 am
चिकन पालक मेथी

साहित्य : चिकन १ किलो, १ पालक जुडी, ४ कांदे, ४ टोमॅटो, १ मेथीची लहान जुडी, २ चमचे आले-लसूण-कोथिंबीर पेस्ट, १ चमचा गरम मसाला पावडर, २ चमचे मिरची पूड,  पाव चमचा हळद,  चिमूटभर हिंग, अर्धी वाटी तेल, ४ चमचे साय आणि चवीनुसार मीठ.

कृती : चिकनचे तुकडे करून त्यांना हळद, मिरची पूड व वाटलेली आले-लसूण-कोथिंबीर पेस्ट लावून कमीत कमी पाच-सहा तास चिकन मुरवत ठेवावे. पालक व मेथी चांगली स्वच्छ धुवून घ्यावी आणि बारीक चिरून घ्यावी. कांदा बारीक चिरून घ्यावा. टोमॅटो मिक्सरमधून काढून त्यांची प्युरी करून घ्यावी. एका पातेल्यात तेल गरम करून त्यात हिंग घालावा व गरम मसाल्याची पावडर टाकून कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा.

कांदा सोनेरी रंगाचा होत आला की, त्यात पालक व मेथी घालून थोडावेळ परतून घ्यावे. मग त्यात साय घालावी. साहित्य एकजीव झाले की तेल सुटू लागते. मग मुरवत ठेवलेले चिकनचे तुकडे व टोमॅटोचा रस घालावा. चिकन अर्धे शिजत आले, की चवीनुसार मीठ घालावे. पाहिजे असल्यास वरुन हिरवी कोथिंबीर बारीक कापून घालावी.


कविता आमोणकर