बटर गार्लिक चिकन

Story: उदरभरण |
04th August, 05:32 am
बटर गार्लिक चिकन

चिकन मुरविण्यासाठी साहित्य -  

अर्धा किलो चिकन तुकडे करून, १ चमचा काळी मिरी पावडर, १ चमचा सोया सॉस, १ चमचा व्हिनेगर, एका अंड्याचा पांढरा बलक, ३ चमचे मका पीठ, ३ चमचे तेल, मीठ

बटर गार्लिक सॉससाठी साहित्य -

२ चमचे बटर, ३ चमचे बारीक कापलेली लसूण, १ चमचा कोथिंबीर, १ चमचा हिरवी मिरची बारीक कापून, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पावडर. २ चमचे मक्याचे पीठ पाण्यात भिजवून दाटसर द्रावण, बारीक चिरलेली कोथिंबीर .

कृती - 

चिकन मुरविण्यासाठी जे साहित्य दिले आहे, ते एकत्र करून त्यात चिकन अर्धा तास मुरवत ठेवावे व त्यानंतर एका पॅनमध्ये थोडे तेल टाकून चिकन फ्राय करून घ्यावे.

एका पॅनमध्ये बटर घालून त्यात बारीक कापलेला लसूण घालून परतून घ्यावे व बारीक चिरलेली कोथिंबीर आणि काळीमिरी पावडर घालावी. मक्याच्या पिठाचे दाटसर द्रावण त्यात घालून दोन मिनिटे शिजवावे व त्यात चिकनचे तुकडे घालावे.


कविता आमोणकर