अखेर पूजा खेडकर प्रकरणाला पूर्ण विराम; केंद्राने समाप्त केली सेवा

यूपीएससीने ३१ जुलै रोजी पूजाची निवड रद्द केली होती आणि तिला भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यावरही बंदी घातली होती.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th September, 01:39 am
अखेर पूजा खेडकर प्रकरणाला पूर्ण विराम; केंद्राने समाप्त केली सेवा

पुणे : केंद्र सरकारने शनिवारी ७ सप्टेंबर रोजी माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून तत्काळ कार्यमुक्त केले. आयएएस (प्रोबेशनरी) नियम १९५४ च्या नियम १२ अन्वये त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पूजा २०२३ च्या बॅचची आयएएस प्रशिक्षणार्थी होत्या. त्यांना CSE-2022 मध्ये ८४१ वा क्रमांक मिळाला. त्या जून २०२४ पासून प्रशिक्षण घेत होत्या. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये स्वत:बद्दल चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

यूपीएससीने केलेल्या तपासणीत पूजा दोषी आढळली होत्या. यानंतर ३१ जुलै रोजी पूजाची निवड रद्द करण्यात आली. पूजावर वय बदलून, तिच्या पालकांबद्दल चुकीची माहिती आणि ओळख बदलून विहित मर्यादेपेक्षा जास्त वेळा नागरी सेवा परीक्षा दिल्याचा आरोप होता. निवड रद्द झाल्यानंतर पूजाने त्यांचे पद गमावले. परिणामस्वरूप त्यांना भविष्यात यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात आली आहे. २८ ऑगस्ट रोजी पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात, यूपीएससीला तिच्यावर कारवाई करण्याचा अधिकार नाही. व जमा केलेल्या सर्व कागदपत्रांची आयोगाने २६ मे २०२२ रोजी व्यक्तिमत्व चाचणीत पडताळणी केली असल्याचे सांगितले होते 

पूजा खेडकरच्या अंतरिम जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. पूजाने न्यायालयाला सांगितले की ती एम्समध्ये तिच्या अपंगत्वाची तपासणी करण्यास तयार आहे. दरम्यान ४ सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या नवीन स्थिती अहवालात पूजाने जमा केलेल्या २ अपंगत्व दाखल्यांपैकी एक बनावट असल्याचा दावा करण्यात आला होता.  महत्त्वाचे म्हणजे सिव्हिल सर्जनच्या कार्यालयातील नोंदीनुसार, अहमदनगर प्राधिकरणाने अपंगत्व प्रमाणपत्र क्रमांक MH2610119900342407 जारी केले नव्हते. त्यामुळे हे अपंगत्व प्रमाणपत्र बोगस असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा