नवी दिल्ली : रेल्वे स्थानकावर आरपीएफचा मोठा छापा, ट्रेनमधून चार कोटींची रोकड, सोने जप्त

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th September, 11:25 pm
नवी दिल्ली : रेल्वे स्थानकावर आरपीएफचा मोठा छापा, ट्रेनमधून चार कोटींची रोकड, सोने जप्त

नवी दिल्ली : आरपीएफने शनिवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर छापा टाकला. यादरम्यान एका ट्रेनमधून सुमारे ४ कोटी रुपयांची रोकड, सोने आणि ३६५ किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाची आयकर आणि जीएसटी विभागाकडून चौकशी सुरू आहे. 


New Delhi Railway Station Par Kya Facilties Milti Hain,नई दिल्ली रेलवे  स्टेशन पर मिलती हैं एयरपोर्ट जैसी लग्जरी सुविधाएं, खास कमरे से लेकर फ्री का  मिलता है वाई-फाई ...


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई राजधानी आणि पूर्वा एक्स्प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड, सोने आणि चांदी अवैधरित्या आणली जात असल्याची गोपनीय माहिती आरपीएफला मिळाली होती. त्यानंतर लगेचच टीम नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचली. ट्रेन  स्थानकावर थांबताच चेकिंग ऑपरेशनला सुरुवात झाली. पार्सल कोचमध्ये हा छापा टाकण्यात आला.  पार्सल कोचच्या तपासणीदरम्यान सुमारे २४ संशयास्पद पॅकेट सापडले. ही सर्व पाकिटे तपासली असता ८५ लाख रुपये रोख, ३८ लाख रुपये किमतीचे सोने आणि ३६५ किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. यानंतर आयकर आणि जीएसटी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली.


नई दिल्ली रेलवे स्टेशन पर मिला 'खजाना', ट्रेन से चार करोड़ कैश, 365 किलो  चांदी बरामद - Four crore cash and 365 kg silver recovered from the train at New  Delhi railway


एवढी मोठी रोकड आणि सोने-चांदी जप्त केल्याबाबत अद्याप कोणीही दावा केला नाही. सध्या दोन्ही विभाग या प्रकरणाचा तपास करत असून ही रोकड, सोने आणि चांदी कोणाची आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे


नई दिल्ली रेलवे स्टेशन पर मिला 'खजाना', ट्रेन से चार करोड़ कैश, 365 किलो  चांदी बरामद - Four crore cash and 365 kg silver recovered from the train at New  Delhi railway

हेही वाचा