सहा वेळा मगो जिंकला, पण फक्त १६ वर्षे

भाजपचा २५ वर्षे, कॉंग्रेसचा १६ वर्षे खासदार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd April, 01:04 am
सहा वेळा मगो जिंकला, पण फक्त १६ वर्षे

पणजी : गोवा मुक्तीनंतर आतापर्यंत राज्यात लाेकसभेच्या एकूण १६ निवडणुका झाल्या. त्यात उत्तर गोव्यात १५ आणि दक्षिण गोव्यात २००७ ची पोटनिवडणूक पकडून १६ निवडणुका झाल्या आहेत. उत्तर गोव्यातील १५ निवडणुकांत मगो पक्षाने सर्वाधिक सहावेळा, तर दक्षिण गोव्यात काँग्रेसने सर्वाधिक दहावेळा बाजी मारली आहे. १९६३ मध्ये राज्यात पहिली लोकसभा निवडणूक झाली होती.


गोव्याला मुक्ती मिळाल्यानंतर १९६२ मध्ये उत्तर गोव्यातून डॉ. पुंडलिक गायतोंडे आणि दक्षिण गोव्यातून डॉ. आंतानियो कुलासो यांची खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पहिली निवडणूक १९६३ मध्ये झाली. तेव्हापासून गत २०१९ च्या निवडणुकीपर्यंत सर्वाधिक सहावेळा हा मतदारसंघ मगोने जिंकला. तर, दक्षिण गोवा सर्वाधिक दहावेळा काँग्रेसच्या उमेदवारांनी जिंकला आहे.

५३ वर्षांत उत्तर गोव्यात झालेल्या १५ आणि दक्षिण गोव्यात झालेल्या १६ निवडणुकांत केवळ संयोगिता राणे या एकमेव महिला खासदार बनलेल्या आहेत. प्रमुख पक्ष असलेल्या भाजप आणि काँग्रेसने या काळात कधीही महिलेला लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली नव्हती. इतिहासात पहिल्यांदाच भाजपने यावेळी दक्षिण गोव्याची उमेदवारी पल्लवी धेंपो यांना दिली आहे.


हेही वाचा