मोपा विमानतळावर प्रवाशाच्या बॅगमध्ये सापडल्या पिस्तुलाच्या सहा जिवंत बुलेट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th April, 11:31 pm
मोपा विमानतळावर प्रवाशाच्या बॅगमध्ये सापडल्या पिस्तुलाच्या सहा जिवंत बुलेट

पेडणे : मोपा विमानतळावर तपासणीवेळी प्रवासी गौरव दळवी (मुंबई) याच्या बॅगमध्ये पिस्तुलाच्या सहा जीवंत बुलेट सापडल्या.

रविवारी दि. १४ रोजी दुपारी १२.५६ वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॅगची तपासणी करत असताना वांद्रे (पूर्व) मुंबई येथील गौरव उदय दळवी याच्या बॅगमध्ये स्क्रीनिंग दरम्यान सहा जीवंत बुलेट सापडल्या. तो मुंबईला जाण्यासाठी आला असता त्याच्याकडे सहा जीवंत बुलेट सापडल्या. या बुलेटचा वैध शस्त्र परवाना त्याच्याकडे नव्हता. या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला. स्क्रीनिंग करणाऱ्या व्यक्तीने मोपा पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. मोपा पोलीस उपनिरीक्षक दीपक हळर्णकर पुढील तपास करीत आहेत.