मासेमारीची हौस बेतली जीवावर

लोटलीत मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th April, 10:06 pm
मासेमारीची हौस बेतली जीवावर

मडगाव : रासय लोटली येथे राहणाऱ्या मॅथ्यू कुलासो (५७) यांचा नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ते मासेमारी करण्यासाठी नदीपात्राकडे गेले असता ही दुर्घटना घडली.

मॅथ्यू कुलासो हे एका गॅरेजमध्ये वेल्डींगचे काम करायचे. त्यांना नदीतील मासे पकडण्याचीही हौस होती. मॅथ्यू राहत असलेल्या रासाई येथील घराशेजारी जुवारी नदीचे पात्र आहे. शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मॅथ्यू जुवारी नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. सायंकाळ होत आली तरीही मॅथ्यू घरी न आल्याने त्यांची पत्नी त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडत असतानाच त्यांना मॅथ्यू नदीच्या पाण्यात बुडाले असल्याची माहिती गावातील लोकांकडून मिळाली. उपस्थितांनी मायना कुडतरी पोलिसांना तसेच मडगाव अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी शोधकार्य सुरू केल्यानंतर मॅथ्यू यांचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. मायना कुडतरी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून या प्रकरणी नोंद केली आहे. मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील शवागारात ठेवलेला आहे. पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न भगत तपास करत आहेत.


हेही वाचा