तलवारीने हल्ला प्रकरणी धारगळमधील पंचाला अटक

मतदान केंद्रावर घडला होता प्रकार

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
10th May, 12:19 am
तलवारीने हल्ला प्रकरणी धारगळमधील पंचाला अटक

पणजी : लोकसभा निवडणूक मतदानानंतर दि. ७ मे रोजी चिचोला धारगळ येथील शैलेश साळगावकर हे मतदान केंद्रावर असताना त्यांना धारगळ येथील माजी सरपंच व विद्यमान पंच अनिकेत गोकुलदास साळगावकर यांनी शिवीगाळ केली. तसेच त्यांच्यावर धारदार शस्त्राने (तलवार) वार केले. या हल्ल्यात शैलेश व त्यांच्या चुलत भावाला शारीरिक दुखापत झाली. तसेच तक्रारदार व त्याच्या चुलत भावाला धमकावले. या घटनेनंतर शैलेश साळगावकर यांनी पेडणे पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिंग एजंट नेमण्याच्या मुद्द्यावरून तक्रारदार शैलेश साळगावकर यांच्यावर तलवार हल्ला केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी पंच अनिकेत साळगावकरला अटक करून गुन्हा नोंदवला आहे.

पुढील तपास पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर करीत आहेत.