प्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवात होणार ५५ ईफ्फीचे पोस्टर आणि ट्रेलर लॉंच

५५ व्या इफ्फीसोबत आयोजित केल्या जाणाऱ्या पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेसाठी (WAVES) “सेव्ह द डेट” चे प्रकाशन देखील भारत पर्वमध्ये होणार आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th May, 04:40 pm
प्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवात होणार ५५ ईफ्फीचे पोस्टर आणि ट्रेलर लॉंच

कान्स (फ्रान्स) : दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट रसिकांसाठी अभूतपूर्व चित्रपटांची मेजवानी घेऊन येणारा कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फ्रान्समध्ये आयोजित केला जातो. भारतासाठी यंदाचा कान्स महोत्सव अनेक गोष्टींच्या अनुषंगाने महत्त्वाचा ठरणार आहे. यंदा मार्चे डू फिल्म्समध्ये अभिनव उपक्रमांद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेचे दर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांना घडवले जाणार आहे. India set to make waves at 77th Cannes Film Festival - India set to make  waves at 77th Cannes Film Festival -

७७व्या कान्स चित्रपट महोत्सवात 'भारत पर्व'च्या माध्यमातून भारतीय कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, फॅशन डिजायनर, गुंतवणूकदार इत्यादी आपल्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण करतील.  गोव्यात २०-२८ नोव्हेंबर २०२४ रोजी  होणाऱ्या ५५  व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अधिकृत पोस्टर आणि ट्रेलरचे लॉंच ‘भारत पर्व’ मध्ये केले जाणार आहे. ५५ व्या इफ्फीसोबत आयोजित केल्या जाणाऱ्या पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेसाठी (WAVES) “सेव्ह द डेट” चे प्रकाशन देखील  भारत पर्वमध्ये होणार आहे.

या प्रसिद्ध चित्रपट महोत्सवात, भारतीय दालनाचे उद्घाटन १०८ व्हिलेज इंटरनॅशनल रिव्हिएरा येथे १५ मे रोजी प्रसिद्ध चित्रपट व्यक्तींच्या उपस्थितीत होणार आहे. या विशेष उपक्रमामुळे भारतीय कलांना एक हक्काचे व्यासपीठ मिळण्यास मदत होणार आहे. याद्वारे विचारांची देवाणघेवाण, चित्रपट व्यवसायाशी, फॅशनशी निगडीत विविध करार, स्क्रीनप्लेवर चर्चा, अनेक बैठका आणि जगभरातील प्रमुख मनोरंजन आणि प्रसार माध्यम घटकांबरोबर संपर्क वाढवणे अशा कामात मदत होणार आहे. Press Area - Festival de Cannes

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC)  फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की FICCI) च्या सहकार्याने या दालनाचे आयोजन केले जाणार आहे. चित्रपट उद्योगांना जोडण्यासाठी आणि सहयोग करण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII-भारतीय उद्योग महासंघ ) च्या माध्यमातून मार्चे डू कान्समध्ये ‘भारत पर्व’ आयोजित केला जाणार आहे.

महोत्सवातील विशेष आकर्षण असलेली, पायल कपाडिया यांची "ऑल वी इमॅजिन ॲज लाइट," ही अप्रतिम कलाकृती  प्रतिष्ठेच्या ‘पाल्म डी'ओर’ पुरस्कारावर आपले नाव कोरण्यासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे, तीन दशकांनंतर, कान्स चित्रपट महोत्सवाच्या अधिकृत निवड स्पर्धा विभागात भारतीय चित्रपटाने मानाचे स्थान मिळवले असून, हा एक महत्वाचा टप्पा आहे. ब्रिटीश-भारतीय चित्रपट निर्मात्या संध्या सुरी यांच्या "संतोष" मधील मार्मिक कथन, करण कंधारी यांच्या डायरेक्टर्स फोर्टनाइट मधील "सिस्टर मिडनाईट" आणि L’Acid (स्वतंत्र चित्रपटांसाठी आंतरराष्ट्रीय वितरकांच्या संघटनेने निवडलेले चित्रपट) मधील मैसम अली यांच्या "इन रिट्रीट" मुळे सिनेमाचा कॅनवास आणखी समृद्ध झाला आहे.It's India's year at 77th edition of Cannes Film Festival - GulfToday

भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (FTII) विद्यार्थ्यांनी बनवलेल्या "SUNFLOWERS WERE FIRST ONES TO KNOW" या चित्रपटाची ‘ला  सिनेफ’ स्पर्धात्मक विभागात निवड झाली आहे. कन्नड भाषेतील लघुपटाची जगभरातून आलेल्या प्रवेशिकांमधून निवड झाली आहे. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात या चित्रपटाची इतर 17 आंतरराष्ट्रीय लघुपटांशी स्पर्धा होईल. त्याशिवाय, श्याम बेनेगल यांचा ‘मंथन’ हा अमूल डेअरी सहकारी चळवळीवर प्रकाश टाकणारा चित्रपट, क्लासिक्स विभागात दाखवला जाईल, जो महोत्सवातील भारताच्या सादरीकरणाला ऐतिहासिक महत्त्व देईल. एनएफडीसी-नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय- एनएफएआय) च्या फिल्म व्हॉल्टमध्ये अनेक दशके या चित्रपटाची रिळे जतन करण्यात आली होती, आणि फिल्म हेरिटेज फाउंडेशन (FHM) द्वारे हा चित्रपट पुनर्संचयित करण्यात आला. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन हे कान चित्रपट महोत्सवातल्या प्रतिष्ठेच्या पियरे  अँजेनीक्स सन्मानाचे मानकरी ठरतील. हा सन्मान मिळवणारे ते पहिलेच भारतीय असून, महोत्सवात सहभागी होणार्‍या प्रतिनिधींसाठी तो आदर्श ठरेल.गोवा, महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, झारखंड आणि दिल्लीसह भारतातील अनेक राज्ये महोत्सवात सहभागी होणार असून भारतातील वैविध्यपूर्ण ठिकाणे आणि चित्रपट क्षेत्रातील प्रतिभा प्रदर्शित करण्यामध्ये हातभार लावतील.Cannes Film Festival Unveils Dates for 2024 Edition

महोत्सवातील भारत पॅव्हेलियनमधील परस्परसंवादी सत्रांमध्ये भारतात चित्रपट निर्मितीसाठी प्रोत्साहन, चित्रपट महोत्सवांमध्ये आंतरराष्ट्रीय सहयोग, चित्रीकरणाचे ठिकाण म्हणून भारत, भारताची स्पेन, यूके आणि फ्रान्स, यासारख्या इतर देशांबरोबर द्विपक्षीय चित्रपट सह-निर्मिती यासारख्या विषयांचा समावेश असेल. जगभरात आपला ठसा उमटवणारा भारतीय चित्रपट उद्योग आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांबरोबर काम करू इच्छिणाऱ्या चित्रपट निर्मात्यांसाठी चर्चा, नेटवर्किंग आणि सहयोगाच्या संधी उपलब्ध करणे, हे या सत्रांचे उद्दिष्ट आहे.