दोन वाहनांच्या धडकेत लाडफे येथे एक ठार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th May, 12:25 am
दोन वाहनांच्या धडकेत लाडफे येथे एक ठार

डिचोली : लाडफे डिचोली येथे बुधवारी रात्री पावणे आठच्या सुमारास दुचाकी व टेम्पो यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मोटारसायकल चालक श्रीनिवास याल्लाप्पा कलुटी (३४, आयडीसी डिचोली, मुळ कर्नाटक) याचा मृत्यू झाला. डिचोली पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.