पेपर प्लेटचे जादा पैसे आकारल्यावरुन मारहाण केल्याने दोघांना अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th May, 12:33 am
पेपर प्लेटचे जादा पैसे आकारल्यावरुन मारहाण केल्याने दोघांना अटक

मडगाव : तक्रारदार मोहम्मद रियाझ व त्याच्या मित्रांना मारहाण केल्याप्रकरणी सातजणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. तर, संशयित मगादी (२३) व अकबर खान (२३, दोघेही रा. घोगळ हाऊसिंग बोर्ड) यांना फातोर्डा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पेपर प्लेटसाठी जादा पैसे घेतल्याच्या कारणास्तव ही हाणामारी झाली होती.

बोर्डा मडगाव येथील बावर्ची रेस्टॉरंटनजिक ही घटना घडली. ८ मे रोजी रात्री उशिरा मोहम्मद अब्दुल रियाज (२५, रा. मूळ आंध्रप्रदेश) याच्यासह त्याच्या दोन मित्रांना मारहाण झाल्याची तक्रार फातोर्डा पोलिसांत दाखल केली आहे. पेपर प्लेटचे जादा पैसे आकारल्यावरुन वाद सुरू झाला व त्यानंतर सर्फराज मगादी (२३, रा. घोगळ, हाऊसिंग बोर्ड), अकबर खान (२३, रा. घोगळ, हाऊसिंग बोर्ड), रफिक याच्यासह आणखी चारजणांनी बेकायदा जमाव करत मोहम्मद रियाज व त्याच्या दोन मित्रांना शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांकडून संशयित सर्फराज मगादी व अकबर खान या दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नाथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमीन नाईक पुढील तपास करत आहेत.