ढवळी येथे कारची धडक बसून दुचाकीस्वार गंभीर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th April, 12:11 am
ढवळी येथे कारची धडक बसून दुचाकीस्वार गंभीर

फोंडा : ढवळी येथे सुसाट वेगाने धावणाऱ्या कारची धडक दुचाकीला बसून बहादूर शाह (५४, ढवळी) हा दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले. कारचालक एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना अपघात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीए - ०८- एन - १६४९ क्रमांकाची कार फोंडा येथून मडगाव येथे जात होती. ढवळी येथे कारचालक एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना समोरून येणाऱ्या जीए - ०५ - व्ही- २२६५ क्रमांकाच्या दुचाकीला कारची धडक बसली. यात रस्त्यावर कोसळून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. त्याला १०८ रुग्णवाहिकेतून उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला गोमेकॉत नेण्यात आले. फोंडा पोलीस स्थानकाचे हवालदार सज्योत सावंत यांनी अपघाताचा पंचनामा केला. 

हेही वाचा