उधारीचे पैसे देण्याच्या बहाण्याने गेला, आणि पुन्हा चोरले १५ लाख

संशयिताविरोधात गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd April, 12:43 am
उधारीचे पैसे देण्याच्या बहाण्याने गेला, आणि पुन्हा चोरले १५ लाख

पणजी : उधारीवर खेळलेले १३.१० लाख रुपये देण्याच्या बहाण्याने तक्रारदार राहत असलेल्या कांदोळी येथील हाॅटेलच्या खोलीत घुसून तिथे ठेवलेले ५ लाख रोख आणि १० लाख रुपये किमतीचे कॅसिनोचे चिप्स चोरी करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा शाखेने संशयित ब्रिजेश रायकवर (मध्यप्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ब्रिजेश यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तक्रारदार कांदोळी येथील नोवाटेल हाॅटेलमध्ये कॅसिनो टेबल ऑपरेट करतो. त्यानुसार, १८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता संशयित ब्रिजेश रायकवरच्या टेबलवर उधारीवर १३.१० लाख रुपये खेळला. त्यानंतर संशयित उधारीचे पैसे देण्याच्या बहाण्याने तक्रारदार राहत असलेल्या खोलीत गेला. त्यानंतर संशयिताने पैसे देण्याएेवजी तक्रारदाराचे ५ लाख रोकड आणि डेल्टीन कॅसिनोचे १० लाख रुपये किमतीचे चिप्स चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याची दखल घेऊन गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल परब यांनी संशयित ब्रिजेश रायकवर याच्या विरोधात भादंसंच्या कलम ३८० आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा