गोव्याचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ वाढविण्यासाठी कटिबद्ध!

मुख्यमंत्री डॉ. सावंत : मुख्यमंत्रीपदी सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साखळीत अभिनंदन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17 mins ago
गोव्याचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ वाढविण्यासाठी कटिबद्ध!



साखळी :
साखळीवासीय व गोव्यातील जनतेचे प्रचंड प्रेम आपुलकी, त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व इतर वरिष्ठ नेते यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळून ७ वर्षे पूर्ण पूर्ण होत आहेत. गोव्याचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ वाढविण्यास मी कटिबद्ध आहे. गोवेकरांप्रती सदैव समर्पित भावनेने कार्य केले असून भविष्यातही हेच कार्य व समर्पण सुरूच ठेवणार, अशी भावना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa Chief Minister Pramod Sawant) यांनी साखळी येथे व्यक्त केली.
मुख्यमंत्री म्हणून काम करताना अंत्योदय तत्त्वावर काम करण्याचा निर्धार केला होता. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या विविध योजना लहानातल्या लहान घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना आतापर्यंत बरेच यश आले आहे. केंद्र सरकारच्या मदतीने गोव्यात दिव्यांग लोकांसाठी दिव्यांशू केंद्र गोमेकॉमध्ये सुरू केले. स्पायनल रिहेब केंद्र बांबोळीच्या केशव सेवा साधनाच्या केंद्रात सुरू करू शकलो. हे एक दुर्मिळ केंद्र असून स्पायनल उपचार गोव्यात मोफत सुरू झाले हे मोठे समाधान आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी उपस्थितांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे अभिनंदन केले.

माझे घर, मुंडकारांचे घर, कृषी संरक्षण कायद्याचा होणार लाभ!
माझे घर, मुंडकारांचे घर व कृषी संरक्षण कायदा या तीन गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. येणाऱ्या काळात माझे घर, मुंडकारांचे घर व कृषी संरक्षण कायदा या तीनही गोष्टींचा गोव्यातील लोकांना फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.