गोव्यात २१ मार्च रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार

१७,२८३ विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
37 mins ago
गोव्यात २१ मार्च रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार

पणजी : गोवा शालांत मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावी (HSSC)  परीक्षेचा (Examination) ) निकाल येत्या शनिवारी २१ मार्च  रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे. यंदा ही परीक्षा १० ते २७ फेब्रुवारी दरम्यान राज्यातील २० परीक्षा केंद्रांवर पार पडली.

कला (Arts), वाणिज्य (Commerce), विज्ञान (Science) आणि व्यावसायिक या सर्व शाखांमधून एकूण १७,२८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. निकाल जाहीर करण्यासाठी पणजी येथील शालांत मंडळाच्या परिषद कक्षात पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना निकाल http://results.gbshsegoa.net या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून, सर्व शाळांना २५ मार्चनंतर लॉगिनद्वारे एकत्रित निकाल पाहता येणार आहे.

शाखानिहाय विद्यार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे :

कला शाखा : ४,११० (१,२६० मुलगे, २,८५० मुली) 

वाणिज्य शाखा : ५,३१३ (२,८४२ मुलगे, २,४७१ मुली) 

विज्ञान शाखा : ५,४२८ (२,३९३ मुलगे, ३,०३५ मुली)

व्यावसायिक शाखा : २,४३२ (१,७०८, ७२४ मुली) 

याशिवाय, खासगी उमेदवार (पूर्ण विषय)  १३९ आणि काही विषयांसाठी २८ उमेदवारांनी परीक्षा दिली. तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत १,२८२ आणि सीडब्ल्यूएसएन श्रेणीतील २१४ विद्यार्थ्यांचाही सहभाग आहे. अपयशी विद्यार्थ्यांपैकी सर्व विषयांसाठी १५ आणि काही विषयांसाठी ४७१ विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा दिली.


हेही वाचा