मेंदूत रक्तस्राव होऊन कामगाराचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th March, 11:24 pm
मेंदूत रक्तस्राव होऊन कामगाराचा मृत्यू

पैंगीण : काणकोण येथील भाटपालचा रहिवासी आणि मूळचा ओडिशाचा असलेला ३० वर्षीय पंचन नाईक याला प्रकृती गंभीर झाल्यामुळे १४ मार्च रोजी काणकोण येथील सामुदायिक आरोग्य केंद्रातून बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारांसाठी नेण्यात आले होते. मंगळवार, १७ मार्च रोजी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.

मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण गावस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाबू देसाई हे करीत आहेत. 

हेही वाचा