मांद्रेत केरळीयन पर्यटकांकडून १४ लाखांचे अमली पदार्थ जप्त

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
27th March, 12:09 am
मांद्रेत केरळीयन पर्यटकांकडून १४ लाखांचे अमली पदार्थ जप्त

मांद्रे-गावडेवाडा येथे अटक केलेल्या मुहम्मद निहाल सोबत पोलीस निरीक्षक शेरीफ ज्याकिस, उपनिरीक्षक कुणाल नाईक, प्रवीण सीमेपुरुषकर व इतर.


हरमल : गावडेवाडा-मांद्रे येथे बूट गेस्ट हाऊसनजीक केरळीयन पर्यटक मुहम्मद निहाल (२९) याच्याकडून चरस व एलएसडी मिळून १४ लाख ३६ हजारांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या कारवाईत २ किलो ६३ ग्रॅम चरस, तसेच १२३ पेपर स्क्वेअर एलएसडी जप्त करण्यात आले. सदर गुन्हा मांद्रे पोलीस हद्दीत घडला आहे.
आरोपी मुहम्मद याच्यावर कलम १६/२०२४, २०/बी १९८५ खाली भादंसं कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत मांद्रे पोलीस निरीक्षक शेरीफ ज्याकिस, पोलीस उपनिरीक्षक कुणाल नाईक, साईश पोकला, विजय गायकवाड, बाबाजी पेडणेकर, राजेश शिरगलकर यांनी कारवाई केली. पोलीस निरीक्षक ज्याकीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सीमेपुरुषकर अधिक तपास करीत आहेत. या कारवाईबाबत उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल व पेडणे उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी अभिनंदन केले.