यूपी बाल आयोगाची धडक कारवाई; बिहारमधून आणलेल्या ९५ मुलांची अयोध्येतून सुटका

अयोध्येतून ९५ मुलांची सुटका करण्यात आली आहे. या मुलांना बिहारमधून यूपीत आणण्यात आले होते. मुलांचे वय ४ ते १२ वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th April, 11:19 am
यूपी बाल आयोगाची धडक कारवाई; बिहारमधून आणलेल्या ९५ मुलांची अयोध्येतून सुटका

लखनऊ : उत्तर प्रदेश बाल आयोगाने शुक्रवारी ९५ मुलांची सुटका केली. या मुलांना बिहारमधून यूपीमध्ये अवैधरित्या नेले जात होते. ही घटना बाल तस्करीशी संबंधित असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे . अयोध्या बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सर्वेश अवस्थी यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी यूपी बाल आयोगाच्या सदस्य सुचित्रा चतुर्वेदी यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर CWC सदस्यांनी मुलांची सुटका करण्यात आली.

सकाळी ९ वाजताच्या सुमारास बाल कल्याण समितीच्या सदस्या डॉ. सुचिता चतुर्वेदी यांना बिहारमधील अररिया आणि पूर्णिया येथून सहारनपूरमधील देवबंदमध्ये अनेक मुलांना बेकायदेशीरपणे नेले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी मानवी तस्करी प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. यानंतर अयोध्या पोलिसांच्या युनिट आणि टीमने शहरातील बडी देवकाली येथे हायवेवर एक बस अडवली. बसमध्ये ९५  मुले आढळून आली. त्याच्यासोबत पाच मौलवी होते. संयुक्त पथकाने सर्व मुलांना आणि मौलवींना चौकशीसाठी सिव्हिल लाईन्सला नेले व त्यांची चौकशी करण्यात आली. .

बाल आयोगाच्या कार्यकर्त्यांनी मुलांची सुटका करून त्यांना वैद्यकीय मदत पुरवली.  मुले ४ ते १२ वर्षे वयोगटातील आहेत आणि बहुतेक मुलांना त्यांना कुठे नेले जात होते याची माहित नाही. पालकांशी संपर्क साधला जात असून ते आल्यावर मुलांना त्यांच्या ताब्यात दिले जाईल. बिहारमधील मुलांचा गट वेगवेगळ्या राज्यांतील मदरशांमध्ये पाठवला जात होता. मुलांना कुठे नेले जात आहे हे माहित नव्हते. मौलवींनी दिलेली माहितीही खोटी निघाली. बालकल्याण समितीचे सर्वेश अवस्थी म्हणाले की, मौलवींकडे मुलांच्या पालकांची नावे आणि संमतीपत्रही नाही. अनेक मुलेही अनाथ आहेत. मौलवी पोलिसांची दिशाभूल करत राहिले.