‘काजू दुष्काळ’ जाहीर करावा !

उत्पादकांना आर्थिक पाठबळ देण्याची सरकारकडे मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th May, 12:17 am
‘काजू दुष्काळ’ जाहीर करावा !

वाळपई : यंदाचा काजू हंगाम नुकसानीचा ठरला. यंदा काजूचे पीक ५० टक्क्यांनी निम्मे झाले. यामुळे काजू उत्पादकांचे आर्थिक व्यवस्थापन कोलमडले आहे. यामुळे सरकारने काजूचा दुष्काळ जाहीर करावा व काजू उत्पादकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी काजू उत्पादकांनी केली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत व कृषिमंत्री रवी नाईक यांनी काही दिवसांपूर्वी यासंदर्भाची घोषणा केलेली आहे. याची अंमलबजावणी ताबडतोब करावी व काजू उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सत्तरी तालुक्यातील काजू उत्पादकांनी केलेली आहे.


सत्तरी तालुक्यातील जवळपास ७० टक्के जनता अजूनही काजूच्या उत्पादनावर आपला उदरनिर्वाह करीत असतात. मात्र यंदा काजूचे उत्पादन पूर्णपणे नुकसानीत गेलेले आहे. सत्तरी तालुक्यातील शेकडो कुटुंबावर याचे परिणाम दिसणार आहेत. त्यामुळे सरकारने काजू दुष्काळ जाहीर करावा व काजू उत्पादकांना मोठ्या प्रमाणात दिलासा द्यावा अशी मागणी काजू उत्पादकांनी केलेली आहे.