महिलेला डुकराच्या किडनीने मृत्यूच्या दाढेतून आणले परत!... अमेरिकेत यशस्वी प्रयोग

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th April, 10:31 am
महिलेला डुकराच्या किडनीने मृत्यूच्या दाढेतून आणले परत!... अमेरिकेत यशस्वी प्रयोग

न्यूयॉर्क : किडनी हा शरिरातील महत्त्वाचा अवयव. दोन्ही किडन्या खराब झाल्या तर जीव गेलाच. अशा रुग्णाला दुसरी किडनी मिळाली तर तो वाचू शकतो. पण, अशी किडनी मिळणे फार कठीण असते. त्यातही त्याची किंमत कोट्यवधीच्या घरात असते. पण, आता चिंता सोडा. कारण डुकराची किडनीही माणसात यशस्वीरित्या रोपन होऊन कार्य करू शकत असल्याचे सिद्ध झाले आहे. मृत्यूंच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या एका महिलेला एका डुकराची किडनी बसवून जीवदान देण्यात अमेरिकेतील डॉक्टरांना यश मिळाले आहे.


अमेरिकन डॉक्टरांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. किडनीच्या आजाराने त्रस्त महिलेचे प्राण डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण करून वाचवले. मानवी किडनी शोधण्यासाठी काही वर्षे लागू शकतात. तोपर्यंत डुकराच्या किडनी प्रत्यारोपण कमी वेळेत करण्याचा विचार केला गेला. अशा किडनीचे प्रत्यारोपण झाल्यावर दोन आठवड्यांनंतरही महिलेच्या शरीरात अशी कोणतीही विपरित लक्षणे दिसली नाहीत. तिच्या शरीराने प्रत्यारोपण केलेली किडनी स्वीकारली आहे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये झाले प्रत्यारोपण

या महिलेचे मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. याआधीही डुकराची किडनी एका महिलेच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आली आहे. मार्च महिन्यात देखील मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये ६२ वर्षीय रुग्णावर डुकराची किडनी प्रत्यारोपित करण्यात आली होती. अवयवदात्याच्या कमतरतेमुळे डॉक्टरांनी रुग्णाच्या शरीरात डुकराची किडनी प्रत्यारोपित केली, त्यानंतर रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. २०२३ मध्ये, मेरीलँड विद्यापीठात अनुवांशिकरित्या सुधारित डुकराचे हृदय दोन रुग्णांमध्ये प्रत्यारोपित केले गेले, परंतु दोन महिन्यांतच दोघांचा मृत्यू झाला.

हेही वाचा