पाकिस्तानी तरुणीचे भारतात हृदय प्रत्यारोपण; मिळाले मोफत उपचार, झाली भारताची फॅन

आयेशाच्या अर्धेअधिक निकामी झालेल्या हृदयाला आधार देण्यासाठी २०१५ साली हृदय पंप बसवण्यात आला. दुर्दैवाने हे उपकरण कुचकामी ठरले आणि डॉक्टरांनी तीचा जीव वाचवण्यासाठी हृदय प्रत्यारोपणाची शिफारस केली.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th April, 09:50 am
पाकिस्तानी तरुणीचे भारतात हृदय प्रत्यारोपण; मिळाले मोफत उपचार, झाली भारताची फॅन

चेन्नई : भारत आणि पाकिस्तानमध्ये कितीही शत्रुत्व असले तरी गरज असेल तेव्हा भारत आपल्या शेजाऱ्याला साथ देतो आणि नवसंजीवनीही देतो. असेच काहीसे पाकिस्तानी तरुणी आयेशासोबत घडले. वैद्यकीय उपचारासाठी भारतात आलेल्या आयेशाला डॉक्टरांनी नवजीवन तर दिलेच पण तिच्यावर मोफत उपचारही केले. एकोणीस वर्षीय आयेशा रशन गेल्या अनेक वर्षांपासून हृदयविकाराने त्रस्त होती.Chennai: Pakistani teen Ayesha Rashan undergoes heart surgery at MGM  hospital free of cost - India Today

एमजीएम हेल्थकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

आयेशाच्या कुटुंबीयांनी चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर हॉस्पिटलमधील इन्स्टिट्यूट ऑफ हार्ट अँड लंग ट्रान्सप्लांटचे संचालक डॉ केआर बालकृष्णन आणि सहसंचालक डॉ सुरेश राव यांच्याकडून आरोग्यविषयक सल्ला मागितला. आयेशाच्या हृदयाच्या पंपमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हृदय प्रत्यारोपण आवश्यक असल्याचा सल्ला वैद्यकीय पथकाने दिला. तसेच तिला काहीवेळ एक्स्ट्रा कॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) वर ठेवण्यात आले होते. तिच्या हृद्यात हिंदुस्तानी दिलाची धडकन, कराचीच्या 19 वर्षीय मुलीवर चेन्नईत  हार्ट ट्रान्सप्लांट - 19 year old girl from karachi heart transplant surgery  in chennai indian ...

दिल्लीतील ब्रेन डेड रुग्णाचे हृदयाचे प्रत्यारोपण करण्यात आले

या शस्त्रक्रियेसाठी एमजीएम हेल्थकेअरच्या डॉक्टरांनी दिल्लीतील रुग्णालयातून आणलेल्या ६९ वर्षीय ब्रेन डेड रुग्णाचे हृदय वापरले.  हृदय प्रत्यारोपणासाठी लागणारे सुमारे ३५ लाख रुपये परवडणार नसल्याने रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना तसे कळवले . त्यानंतर वैद्यकीय पथकाने कुटुंबाला आर्थिक मदत करणाऱ्या ऐश्वर्यम ट्रस्टशी संपर्क साधला. याच ऐश्वर्यम ट्रस्टच्या मदतीने आयेशाची ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. निदान, प्रत्यक्ष शस्त्रक्रिया आणि रिकव्हरीसाठी आयेशा तब्बल १८  महिने भारतात राहिली.  Aishwaryam Trust - YouTube

आयेशाची आई सनोबर म्हणाली की जेव्हा ती भारतात पोहोचली तेव्हा आयेशाची जगण्याची शक्यता फक्त १० टक्के होती.  "खरे सांगायचे तर, भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये चांगल्या वैद्यकीय सुविधा नाहीत. मला वाटते भारत या बाबतीत खूप प्रगत आहे.  जेव्हा पाकिस्तानमधील डॉक्टरांनी सांगितले की प्रत्यारोपणाच्या सुविधा उपलब्ध नाहीत तेव्हा आम्ही डॉ. के.आर. बालकृष्णन यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सर्व सोपस्कार पार पाडले." 19-year-old from Pakistan gets Indian's heart in Chennai hospital | Chennai  News - Times of India

आयेशा झाली भारताची आणि डॉक्टरांची फॅन 

आयेशा आणि तिची आई सनोबर यांनी भारतीय डॉक्टर आणि भारत सरकारचे आभार मानले. डॉक्टरांनी मला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे सनोबर यांनी सांगितले. डॉक्टरांच्या टीमने त्यांची भारतात राहण्याची आणि पैशाची व्यवस्था केली. प्रत्यारोपणामुळे मी खूप आनंदी आहे, मला याचाही आनंद आहे की पाकिस्तानी मुलीच्या आत भारतीय हृदय धडधडत आहे. आई सनोबारने सांगितले की आयेशाच्या स्वप्नांना आता नवी दिशा मिळेल. आता आयेशा फॅशन डिझायनर बनण्याचे स्वप्न पाहत आहे.Indian heart gives new lease of life to Pakistani girl | India News -  News9live