‘ईव्ही​एम’च्या सुरक्षेसाठी १,२०० जवानांचे कवच

आल्तिनो-पणजी, कोंब-मडगाव येथे स्ट्राँग रुम

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
08th May, 01:12 am
‘ईव्ही​एम’च्या सुरक्षेसाठी १,२०० जवानांचे कवच

पणजी : राज्यात उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार दि. ७ मे रोजी मतदान झाले. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आल्तिनो-पणजी येथील सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजजवळ बहुउद्देशीय चक्रिवादळ निवाऱ्यात, तर दक्षिण गोव्यात कोंब-मडगाव येथील श्री दामोदर वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयात स्ट्राँग रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही स्ट्राँग रुमची ठिकाणी तीन स्तरावर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासह (सीएपीएफ), भारतीय राखीव बटालियन (आयआरबी) आणि गोवा पोलीस मिळून १,२०० जवान तैनात करण्यात आले आहेत.

दोन्ही मतदारसंघातील स्ट्राँग रुमसाठी प्रत्येक पाळीत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासह (सीएपीएफ) सुमारे १०५ जवानाची एक कंपनी तैनात करण्यात आली आहे. त्यानंतर दुसऱ्या स्तरावर भारतीय राखीव बटालियनची (आयआरबी) एक कंपनी तैनात करण्यात आली आहे. त्यानंतर तिसऱ्या स्तरावर गोवा पोलिसांचे एक प्लाॅटून तैनात करण्यात आले आहे. याशिवाय उत्तर गोव्यात १७ उपअधीक्षकांना पर्यवेक्षक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय ३१ पोलीस निरीक्षकांना गार्ड कमांडंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर १८ उपनिरीक्षकांना उप गार्ड कमांडंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त गोवा पोलिसांचे वाहतूक पोलीस, दहशतवाद विरोधी पथक, बाॅम्ब निकामी पथक, जलद कृती दलाचे पोलीस तसेच विशेष विभागाचे पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा यंत्रणेसाठी सुमारे २०० पोलीस तैनात करण्यात आली आहे.

हेही वाचा