सासष्टीत मतदानाच्या टक्क्यांत वाढ


08th May, 12:58 am
सासष्टीत मतदानाच्या टक्क्यांत वाढ

प्रतिनिधी। गोवन वार्ता      

मडगाव : दक्षिण गोव्यात एकूण ५ लाख ९८ हजार ७६७ मतदार असून त्यांतील ४ लाख ४२ हजार ४८९ मतदारांनी मतदान केल्याने एकूण ७३.९० टक्के मतदान झाले. सासष्टीत ७१.११ टक्के मतदान झाले असून मागील निवडणुकीपेक्षा ३ टक्के जास्त मतदान झाले आहे.       

राज्य निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, नुवेमध्ये ७०.७३ टक्के, कुडतरीत ७१.५ टक्के, फातोर्डा ७२ टक्के, मडगाव ७३.६४, बाणावली ६८.४९ टक्के, नावेली ७१.५३ टक्के, कुंकळ्ळी ७१ टक्के व वेळ्ळीत ६९ टक्के मतदान सासष्टीत झाले आहे. या मतदानाची टक्केवारी काढली असता ७१.११ इतकी होते. त्यामुळे सासष्टीतील एकूण २ लाख ३९ हजार ८३७ मतदारांपैकी १ लाख ७० हजार ५४९ मतदारांनी मतदान केले.      

सासष्टीचा विचार करता नुवे मतदारसंघात २८,५०२, कुडतरी ३०,५१३, फातोर्डा ३१,०३६, मडगाव ३०,२६९, बाणावली २९,१३४, नावेली २९,०२९, कुंकळ्ळी २९,६५४, वेळ्ळीत ३१,७०० मतदार आहेत. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीवेळी नुवेत १९,५३६, कुडतरी २०,५२३, फातोर्डा २२,१७८, मडगाव २१,१४०, बाणावली १८,६७२, नावेली १९,६१४, कुंकळ्ळी २०,१७३ व वेळ्ळीत २१,४८३ मतदारांनी मतदान केले होते. त्यावेळी सासष्टीतील मतदानाचा टक्का हा ६८.०९ इतका होता. २००९ मध्ये साधारण ६६.८८ टक्के मतदान झाले होते. यात नुवे २०,१९८, कुडतरी १९,७९३, फातोर्डा २०,६३९, मडगाव २०,९४५, बाणावली १९,१८९, नावेली १८,७०५, कुंकळ्ळी १९,५०८ व वेळ्ळीत २०,८७८ मतदारांनी मतदान केले होते.      

दक्षिण गोव्यातील लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी पाहता २००९ मध्ये २,७१,९६० मतदारांनी मतदान केले होते. यावेळी मतदानाची टक्केवारी ५०.९५ होती. २०१४ मध्ये मतांची टक्केवारी २५ ने वाढली व ७५.२७ टक्के इतकी झाली. यावेळी ४ लाख १० हजार ३६९ मतदारांनी मतदान केले. २०१९ मध्ये ४ लाख २४ हजार ७१८ मतदारांनी मतदान केले व पुन्हा एकदा मतांची टक्केवारी घटून ७३.३१ एवढी झाली होती. २०१४ मध्ये वाढलेल्या मताधिक्याचा फायदा भाजपला झाला व भाजप उमेदवार निवडून आला होता. आता पुन्हा ४,४२,४८९ मतदारांनी हक्क बजावला आहे.      

दक्षिण गोव्यातील पोस्टल मतदानाचा विचार करता एकूण ५,६०४ मतदारांनी पोस्टल मतदानासाठी अर्ज केले होते. त्यांतील ४,९९१ एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर ४५५ जणांनी मतदान केलेले नाही. दक्षिण गोव्यातील पोस्टल मतदानाची टक्केवारी ७४.६९ एवढी आहे.

वास्कोत सर्वांत कमी ६७ टक्के मतदान

दक्षिण गोव्यातील विजयाचे समीकरण हे सासष्टी तालुक्यातील मताधिक्यावर अवलंबून असते. गतवेळीपेक्षा जास्त मतदान झाले असले तरीही दक्षिण गोव्याच्या इतर भागातही मतदान जास्त झाले आहे. सांगे, सावर्डे, मडकई या भागात ७७ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले, तर वास्कोत ६७.१० टक्के हे दक्षिणेत सगळ्यात कमी मतदान झाले आहे. आकडेवारी पाहता कॉँग्रेस व भाजप दोन्ही उमेदवारांत चुरशीची लढाई असून विजयी उमेदवाराचे मताधिक्य जास्त नसेल, असे सध्याच्या आकडेवारीवरून दिसते.    

हेही वाचा