पार-उसगाव येथे दोन दुचाकींची टक्कर, दोघे युवक जखमी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th April, 11:57 pm
पार-उसगाव येथे दोन दुचाकींची टक्कर, दोघे युवक जखमी

पार-उसगाव येथील अपघातग्रस्त वाहने.

फोंडा : पार-उसगाव येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात मोहित महादेव नाईक (१८, मुरमणे-गुळेली) हा दुचाकी चालक गंभीर, तर विराज शेटकर (भामई-पाळी) हा किरकोळ जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या मोहित नाईक याला अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार-उसगाव येथील जीए-०४-पी-३५६६ आणि जीए-०५-एच-१०५२ या दोन दुचाकींमध्ये टक्कर झाली. यात दुचाकीचालक मोहित नाईक हा गंभीर जखमी झाला. जखमीला १०८ रुग्णवाहिकेतून उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सज्योत सावंत यांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.

हेही वाचा