गोव्यात ९ ते १२ मे दरम्यान तुरळक पाऊस शक्य

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th May, 02:27 pm
गोव्यात ९ ते १२ मे दरम्यान तुरळक पाऊस शक्य

पणजी : गोव्यात ६ ते ८ मे दरम्यान वातावरण अंशत: ढगाळ राहील. नंतर ९ ते १२ मे दरम्यान तुरळक पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय आज आणि उद्या वातावरण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. पुढील सात दिवस कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील पाच दिवसात कमाल तापमान मोठा बदल होण्याची शक्यता नाही. पणजीत सोमवारी कमाल ३३.५ तर किमान २७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मुरगाव येथील कमाल तापमान ३३.६ अंश व किमान तापमान २७.४ अंश सेल्सिअस होते.

आज पणजी येथील सापेक्ष आर्द्रता ७७ टक्के तर मुरगाव येथील ८४ टक्के होती. पुढील सात दिवस सापेक्ष आर्द्रतेत मोठा बदल होण्याची शक्यता नसल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे. सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्क्यांदरम्यान असण्याची शक्यता आहे.
या सात दिवसात हीट इंडेक्स म्हणजेच जाणवणारे तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा कमी राहण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली आहे.

हेही वाचा