बाजारभाव पणजी... वालपापडी स्वस्त, मिरच्या मात्र शंभरी पारच!

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th May, 01:24 pm
बाजारभाव पणजी...  वालपापडी स्वस्त, मिरच्या मात्र शंभरी पारच!

पणजी : गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोमवारी पणजी बाजारात भाज्यांच्या दरात किंचित चढ-उतार दिसून आला. मागील आठवड्यात २४० रुपये किलो असणारे  वालपापडीचे दर २०० रुपये झाले आहेत. असे असले तरी मिरची, शिमला मिरची, शेवगा, वाल अजूनही शंभरी पार आहेत. पणजी बाजारात मोठा लिंबू १० रु. तर लहान लिंबू ८ रुपयाला एक नग या दराने विकला जात होता. तर कोथिंबीरची जुडी २५ ते ३० रुपये या दराने विकली जात आहे.

मिरची आणि शिमला मिरची प्रत्येकी १२० रु. किलो दराने विकले जात होते. वाल १०० रु. तर शेवग्याचे दर १०० ते १२० रुपये किलो होते. भेंडी, दोडका, कारले प्रत्येकी ८० रु. किलो होते. वांगी, गवार, गाजराचे दर प्रत्येकी ६० रु. किलो राहिले. काकडी ५० रु. किलो तर दुधी ५० रुपयांना एक नग या दराने विकले जात होते. मेथी २५ ते ३० रु., शेपू २० रु. तर पालक १० रुपयाला एक जुडी होता. फ्लॉवर ४० रु. नग तर कोबी ३५ रुपये किलो या दराने पणजीत विकला जात आहे.

पणजी बाजारात कांदा, बटाटा प्रत्येकी ४० रुपये किलो होते. टोमॅटोचे दर १० रुपयांनी कमी होऊन ३० रुपये झाले होते. आल्याचे दर वाढून २४० रुपये तर लसूण ३२० रुपये किलो होते.

फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर कांदा ३० रु., टोमॅटो २७ रु. तर बटाटा ३८ रुपये किलो होता. तर भेंडी २० रु., कोबी २८ रु., गाजर ४२ रु., वालपापडी १७५ रु., मिरची ६४ रुपये किलो दराने विकली जात आहे. तर फ्लॉवरचे दर प्रती नग ३० रुपये आहेत.

पणजी बाजारात मानकुराद आंब्याची आवक वाढली असली तरी दर अजूनही जास्त आहेत. मध्यम आकाराचे मानकुराद आंबे ६०० ते ८०० रुपये तर मोठे मानकुराद आंबे दीड हजार रुपये डझन दराने विकले जात आहेत. तर हापूस आंबा ५०० ते ७०० रुपये डझन होता. गेल्या काही दिवसात अंड्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. सोमवारी बाजारात अंड्याचे दर ७५ ते ८० रुपये डझन होते.

हेही वाचा