व्यसनाधीन पत्नीकडून छळ! पतीचे गुप्तांग कापण्याचा प्रयत्न... पोलिसांनी केली अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th May, 02:47 pm
व्यसनाधीन पत्नीकडून छळ! पतीचे गुप्तांग कापण्याचा प्रयत्न... पोलिसांनी केली अटक

लखनऊ (उ. प्र.) : स्त्रियांना कोमल हृदयी, भावून, हळव्या, संवेदनशील मनाच्या म्हटले जाते. पण, बिजनौर जिल्ह्यातील स्योहारा येथे एका महिलेने क्रौर्याच्या सीमा ओलांडत पतीचे हात-पाय बांधून त्याच्या शरीराला जळत्या सिगारेटने चटके दिले. एवढेच नाही तर चाकूने त्याचे गुप्तांग कापण्याचाही प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोसिलांनी महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवून तिला अटक केली आहे.

गंभीर जखमी झालेल्या पतीवर इस्पितळात उपचार सुरू आहेत. घटनेचा व्हीडिओ पाहून पोलीस अधिकारीही चक्रावले आहेत. पत्नीच्या अत्याचारामुळे त्रस्त झालेल्या पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे.

स्योहारा गावाचे रहिवासी मन्नान जैदी याने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ‘१७ नोव्हेंबर रोजी शफियााबाद स्योहारा गावातील रहिवासी मयत खुर्शीद अहमद यांच्या मुलीवर प्रेम जडले. २०२३ रोजी तिच्याशी प्रेमविवाह केला. लग्नानंतर पत्नीच्या सांगण्यावरून कुटुंबापासून वेगळा झालो आणि भाड्याच्या घरात राहू लागलो. पत्नीचे चारित्र्य चांगले नसल्याचे लग्नानंतर त्याला समजले. ती दारू, सिगारेट व अन्य मादक पदार्थांचे करते, हे आढळून आले. यावरून आमच्यात भांडणे सुरू झाली. या प्रकारानंतर तिने माझा छळ सुरू केला’, असे त्याने तक्रारीत नमूद केले आहे.

२९ एप्रिल २०२४ च्या रात्री त्याची पत्नी त्याच्याकडे आली आणि दुधात काही मादक पदार्थ मिसळून त्याला प्यायला लावले. यामुळे त्याला गुंगी आली. तेव्हा तिने घरातील पडद्यांनी त्याचे हात-पाय बांधून क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. ठार मारण्याच्या उद्देशाने तिने पतीचे हात बांधून त्याचा गळा दाबला. सिगारेटचे चटके दिले. चाकूने गुप्तांग कापण्याचा प्रयत्न केला. या वेदनेने पती ओरडत राहिला. परंतु, त्याच्या क्रूर पत्नीला दया आली नाही, असेही पतीने तक्रारीत नमूद केले आहे.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर तरुणाच्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे. दुसरीकडे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलीस अधिकारीही चक्रावले. पोलिसांनी आरोपी पत्नीविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून तिला अटक केली आहे.

हेही वाचा