मिरवणुकीसाठी आवश्यक परवानगी न घेताच प्रचार; आरजीच्या मनोज परबांवर गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
06th May, 12:38 pm
मिरवणुकीसाठी आवश्यक परवानगी न घेताच प्रचार; आरजीच्या मनोज परबांवर गुन्हा नोंद

फोंडा :  तिस्क- उसगाव परिसरात दि. १ मे रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विनापरवाना प्रचार मिरवणूक काढल्याप्रकरणी आरजीपीचे उत्तर गोवा लोकसभा उमेदवार मनोज परब यांच्या विरोधात फोंडा पोलिसांकडून गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. मनोज परब यांनी मिरवणुक आयोजित करण्यास आवश्यक  परवाना घेतला नव्हता. 

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी  उमेदवार मनोज परब यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मनोज परब यांनी जीए - ०५-टी - ३१३४ क्रमांकांच्या जीप मधून मिरवणूक काढली. यावेळी सुमारे ५० कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. याप्रकरणी सत्तरी तालुक्याचे उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकर यांनी मनोज परब यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.  रीतसर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मनोज परब यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निरीक्षक तुषार लोटलीकर या प्रकरणी तपास करीत आहेत.

हेही वाचा