डॉक्टरांचा जबाब, उलटतपासणी पूर्ण, एकाला उपस्थितीसाठी समन्स

बाबूश मोन्सेरात विरोधात बलात्कारप्रकरणी सुनावणी ८ मे रोजी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th April, 12:09 am
डॉक्टरांचा जबाब, उलटतपासणी पूर्ण, एकाला उपस्थितीसाठी समन्स

मडगाव : मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याविरोधात सुरू असलेल्या बलात्कारप्रकरणी साक्षीदार डॉ. मधू घोडकिरेकर यांचा जबाब व उलटतपासणी पूर्ण करण्यात आली. आणखी एका संशयिताला उपस्थितीचे समन्स जारी करण्यात आले असून पुढील सुनावणी ८ मे रोजी होणार आहे.
बलात्कारप्रकरणी मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याविरोधात दक्षिण गोवा जिल्हा विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी बाबूश यांना कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाने दिलेली आहे. सुनावणीवेळी संशयित रोझी फेर्रांव उपस्थित होत्या. यापूर्वी पीडितेची साक्ष व उलटतपासणी प्रक्रिया पूर्ण झाली असून पीडितेची फेरसाक्ष नोंदवण्यास परवानगी नाकारलेली आहे. साक्षीदार डॉ. मधू घोडकिरेकर यांचा जबाब नोंद झाल्यावर उलटतपासणीही आता पूर्ण करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ८ मे रोजी दुपारी २.३० वाजता होणार आहे. यावेळी आणखी एका साक्षीदाराला उपस्थितीसाठी समन्स बजावण्यात आला आहे.                  

हेही वाचा