टी-२० विश्वचषकावर दहशतवादी हल्ला करण्याची पाकिस्तानमधून धमकी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th May, 11:39 am
टी-२० विश्वचषकावर दहशतवादी हल्ला करण्याची पाकिस्तानमधून धमकी

नवी दिल्ली. टी-२० विश्वचषक २०२४  लवकरच सुरु होणार आहे. मात्र याआधी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या मेगा इव्हेंटचे आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये केले जाणार आहे. यातच वेस्ट इंडिजला वर्ल्ड कपपूर्वी दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. विश्वचषकापूर्वी या बातमीने या स्पर्धेत सहभागी संघांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.T20 World Cup 2024: టీ20 వరల్డ్ కప్కు ఉగ్రదాడి భయం..? - NTV Telugu

मात्र, क्रिकेट वेस्ट इंडिजचे सीईओ म्हणाले की, आम्ही त्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत. सुरक्षेशी निगडीत कोणत्याही बाबींशी तडजोड केली जाणार नाही. खबरदारी म्हणून स्पर्धेदरम्यान सुरक्षा यंत्रणेची कुमक वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. Terror threat to T20 World Cup in West Indies from North Pakistan: Report |  Cricket News - Times of India

सुरक्षा यंत्रणांनी रिपोर्टमध्ये दावा केला आहे की सदर धमकी इस्लामिक स्टेटचे दहशतवादी प्रॉपगेंडा जगभर पसरवण्याची जवाबदारी घेतलेल्या नाशिर पाकिस्तानच्या मीडिया हॅंडलवरून देण्यात आली आहे. आयसिसच्या सोशल मीडिया हॅंडल्सवरुण याआधीदेखील अनेक जागतिक स्तरावरील स्पर्धांना लक्ष्य बनवण्यात आले आहे.  CARICOM on alert for any threat to the World Cup – Rowley – News  Anemonedivingcenter

हेही वाचा